Sukhoi 30 MKI : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं सुखोई लढाऊ विमानातून उड्डाण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज तेजपूर विमानतळावर सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाने उड्डाण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी राष्ट्रपती हवाई दलाच्या गणवेशात दिसून आल्या.
भारतीय त्रिदलाच्या प्रमुख या नात्यानं त्यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
image 2तसेच सैन्याची शक्ती, शस्त्र आणि धोरणांची देखील माहिती देण्यात आली.
त्यानंतर त्यांनी सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाने हिमाचल प्रदेशकडे उड्डाण केलं.
भारत आणि चीनमध्ये अरुणाचल प्रदेशवरुन वाद सुरु आहे. अशातच राष्ट्रपतींनी सुखोई लढाऊ विमानानं उड्डाण केलं आहे.
या उड्डाणामुळे भारत हा ताकदवान देश असल्याचा संदेश जगासमोर गेला आहे.
राष्ट्रपती मुर्मू या अशाप्रकारची कामगिरी करणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.
भारतीय हवाई दलाच्या बलाढ्य सुखोई-30 MKI लढाऊ विमानातून उड्डाण करणे हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता, असं राष्ट्रपतींनी म्हटलं