ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 'वारसा' परत, 29 पुरातन वस्तूंची पंतप्रधानांकडून पाहणी
ऑस्ट्रेलियाने भगवान शिव, भगवान विष्णू आणि जैन परंपरेशी संबंधित 29 पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत, त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूत्रांनी सांगितले की, एक ऐतिहासिक पाऊल उचलत ऑस्ट्रेलियाने 29 पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत.
या पुरातन वस्तूंचे सहा गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. या वस्तू अतिशय प्राचीन असून भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्रतिक आहे.
यामध्ये अने देवी-देवतांच्या मूर्ती, प्राचीन सजावटीचे सामान यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.
या पुरातन वस्तू 'भगवान शंकर आणि त्यांचे शिष्य', 'शक्तीची उपासना', 'भगवान विष्णू आणि त्यांची रूपे', जैन परंपरा, चित्रे आणि शोभेच्या वस्तू या सहा श्रेणीतील आहेत.
यामध्ये प्रामुख्याने वाळूचा खडक, संगमरवरी, कांस्य, पितळ अशा विविध प्रकारच्या साहित्यापासून बनवलेली शिल्पे आणि कागदावर काढलेली चित्रे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या पुरातन वस्तू प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा येथील परंपरेचे प्रतिक असल्याची माहिती आहे.