Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aero India 2023 : आशियातील सर्वात मोठा Air Show, एअरो इंडिया 2023 ला पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात; जगाला दिसणार मेड इन इंडियाची ताकद
आजपासून एअरो इंडिया 2023 ला सुरुवात झाली आहे. यामध्ये भारतीय सैन्याच्या हवाई दलाकडून उत्तम हवाई कसरतींचं दर्शन पाहायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी आज एअरो इंडिया 2023 (Aero India Show 2023) कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलं आहे. एअरो इंडिया 2023 मध्ये जगाला भारताची ताकद दिसणार आहे.
हा एअर शो 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमधील येलहंका एअर फोर्स स्टेशनमध्ये एअरो इंडिया 2023 कार्यक्रम होत आहे.
यामध्ये भारतीय हवाई दलाची वेगवेगळी प्रात्यक्षिकं पाहायला मिळणार आहेत. हवाई दलात नव्याने सामील करण्यात आलेलं तेजस लढाऊ विमान (Fighter Jet Tejas) यातील मुख्य आकर्षण असणार आहे.
'एअरो इंडिया' (Aero India Show) कार्यक्रमामध्ये जगाला भारताची नवीन ताकद पाहायला मिळणार आहे.13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान बंगळुरूमध्ये 'एअरो इंडिया' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
भारत लष्करी विमाने, हेलिकॉप्टर, संरक्षण उपकरणे आणि आधुनिक युगातील एव्हीओनिक्स (Avionics) म्हणजेच हवाई क्षेत्रातील निर्मितीसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून नावारुपाला येताना दिसत आहे. या दृष्टीने 'एअरो इंडिया' शो फार महत्त्वाचा आहे.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) याबाबत निवेदन जारी करत म्हटलं आहे की, 'एअरो इंडिया 2023' (Aero India 2023) ची थीम द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज (The Runway to Billion Opportunities) आहे.
दरम्यान, एअरो इंडिया शोदरम्यान हवाई क्षेत्रातील ट्रॅफिक नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना (Advisory) जारी करण्यात आल्या आहेत. बंगळुरु पोलिसांनी वाहतुकीसंदर्भातही सूचना जारी केल्या आहेत.
एअरो इंडिया 2023 मध्ये 80 हून अधिक देशांचा सहभाग दिसेल. सुमारे 30 देशांचे मंत्री, जागतिक आणि भारतीय OEM चे 65 सीईओ या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) माहिती दिली आहे की, एअरो इंडिया कार्यक्रम लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA)-तेजस, HTT-40, डॉर्नियर लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH), लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि ॲडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर (ALH) सारख्या स्वदेशी हवाई प्लॅटफॉर्मच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळेल.
या कार्यक्रमात मेक इन इंडियासोबतच देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन मिळेल. या एअर शोच्या माध्यमातून भारत हवाई क्षेत्रात आपली ताकद दाखवणार आहे.
एअर इंडिया 2023 कार्यक्रमासाठी तब्बल 731 कंपन्यांनी आपल्या शस्त्रांचं प्रदर्शन करण्यासाठी नोंदणी केली आहे. 731 कंपन्यांमध्ये 633 भारतीय आणि 98 विदेशी कंपन्यांचा समावेश आहे.