PM Modi celebrates Christmas : 'ख्रिश्चन समुदायाशी माझे जुने नाते'; PM मोदींनी असा साजरा केला ख्रिसमस, पाहा फोटो
ख्रिसमसच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी ख्रिश्चन समुदायाच्या लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्याशी आपले खूप जुने आणि जवळचे नाते असल्याचे सांगितले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविकासाचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचावेत आणि कोणीही यापासून वंचित राहणार नाही याची केंद्र सरकार काळजी घेत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आज देशात होत असलेल्या विकासाचे फायदे ख्रिश्चन समाजातील लोकांपर्यंत, विशेषतः गरीब आणि वंचितांपर्यंत पोहोचत असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'या ख्रिसमसच्या निमित्ताने मी देशातील ख्रिश्चन समुदायासाठी एक गोष्ट नक्कीच सांगेन. देशासाठी तुमचे योगदान भारत अभिमानाने स्वीकारतो. स्वातंत्र्य चळवळीत ख्रिश्चन समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
पीएम मोदी म्हणाले, 'ख्रिश्चन समुदायाने समाजाला दिशा देण्यामध्ये सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही मंडळी समाजसेवेत सक्रिय सहभाग घेत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. गरीब आणि वंचितांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात असेही त्यांनी म्हटले.
आजही भारतभरातील ख्रिश्चन समाजाच्या संस्था शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान देत असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू देण्याच्या परंपरेचा उल्लेख करून ते म्हणाले की, यानिमित्ताने येणाऱ्या पिढ्यांना अधिक चांगली पृथ्वी कशी देता येईल याचा विचार व्हायला हवा असेही त्यांनी म्हटले.
केंद्र सरकारच्या 'वोकल फॉर लोकल' मोहिमेत ख्रिश्चन समुदायाने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधान म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते ख्रिश्चन समाजातील गुरूंना भेटायचे. त्यांनी सांगितले की ते प्रतिनिधित्व करत असलेल्या मणिनगर विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने ख्रिश्चन राहत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की येशू ख्रिस्ताचा जीवन संदेश करुणा आणि सेवेवर केंद्रित होता आणि त्यांनी सर्वसमावेशक समाजासाठी काम केले जेथे सर्वांसाठी न्याय आहे. ते म्हणाले, 'ही मूल्ये आपल्या देशाच्या विकासाच्या प्रवासात मार्गदर्शकाप्रमाणे मार्गदर्शन करत आहेत.
पीएम मोदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर 'सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. हा सण सर्वांसाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो असे पंतप्रधानांनी म्हटले.