Photo: आईचं दूध कोण प्यायलंय याचा निर्णय लाल चौकात, नरेंद्र मोदी यांचं दहशतवाद्यांना आव्हान
आईचं दूध प्यायला असाल तर श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा असं आव्हान दहशतवाद्यांनी दिल्यानंतर ते मी स्वीकारलं आणि एकट्याने तिरंगा फडकावला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सांगितलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनरेंद्र मोदी यांनी आज संसदेत बोलताना एक जुना किस्सा सांगितला. श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकण्याचा संकल्प करुन मी जम्मू काश्मिरमध्ये यात्रा घेऊन गेलो होतो असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
त्यावेळी 'पाहूयात, कोण आपल्या आईचं दूध प्यायलंय, जो लाल चौकात येऊन तिरंगा फडकवतोय ' अशा आशयाचं पोस्टर्स दहशतवाद्यांनी लावले होते.
जम्मू काश्मीरमधील भरसभेत सांगितलं होतं, 26 जानेवारीला सकाळी 11 वाजता मी श्रीनगरमधील लाल चौकात पोहोचतोय. विना बुलेटफ्रुफ जाकेट आणि सुरक्षा रक्षाकांच्याशिवाय येतो असं नरेंद्र मोदी म्हणाले. कोण आपल्या आईचं दूध प्यायलंय याचा निर्णय लाल चौकात होईल असं आव्हान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना दिलं.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला. त्यावेळी माध्यमांनी मला सांगितलं की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकावला जातो त्यावेळी तोफांच्या सलामी दिल्या जातात, आज त्यातलं काहीच झालं नाही.
त्यावर नरेंद्र मोदी म्हणाले की, मी लाल चौकात तिरंगा फडकावला त्यावेळी पाकिस्तानच्या तोफांनीही मला सलामी दिली, गोळ्या चालवल्या गेल्या.
आज जम्मू काश्मीरला न घाबरता जाता येतं ते आमच्या सरकारमुळे, आज जम्मू काश्मीरमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही कार्यरत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सांगितलं.
आज जम्मू काश्मीरमध्ये हर घर तिरंगा कार्यक्रम साजरा झाला. काही लोक म्हणायचं की या ठिकाणी तिरंगा लावला तर शांतता नष्ट होईल. पण आज तेच लोक तिरंगा यात्रेत सामील झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक संदर्भ देत काँग्रेसवर टीका केली. 'तुम्हारे पाव के निचे कोई जमीन नही... कमाल ये है की फिरभी तुम्हे यकीन नही' या दुष्यंत कुमार यांच्या कवितेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका केली.