Photo Gallery : ओडिशाच्या कलाकाराने तब्बल 4830 माचिसच्या काड्यांनी बनवली जगन्नाथपुरीची लघुचित्रे! एकदा पाहाच
ओडिशा : पुरी येथील सास्वत रंजन साहू या कलाकाराने माचिसच्या काड्यांसह भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची लघुचित्रे बनवली आहेत. (pc - @ANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाहू म्हणाले, मी त्या बनवण्यासाठी 4,830 मॅचस्टिक्स म्हणजेच माचिसच्या काड्यांचा वापर केला आहे.(pc - @ANI)
साहू म्हणाले, ही लघुचित्रे पूर्ण करण्यासाठी त्यांना 18 दिवस लागले, (pc - @ANI)
कोरोनाच्या काळातही ओडिशाचे कलाकार सास्वत रंजन साहू यांनी 3635 माचिसच्या काड्यांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती बनवली होती.
तेव्हा ही मूर्ती बनवण्यासाठी त्यांनी 3,635 माचिसच्या काड्या वापरल्या होत्या, तसेच ती पूर्ण करण्यासाठी त्यांना 11 दिवस लागले होते.
या मूर्तीच्या माध्यमातून साहूंनी तेव्हा भगवान जगन्नाथांना आपल्या जीवनातून कोरोना महामारी नष्ट करण्याची प्रार्थना केली होती.
माहितीनुसार, जगन्नाथ भगवान यांची रथयात्रा 1 जुलै 2022 रोजी पुरी येथे काढण्यात येणार आहे. याच्या 15 दिवस आधी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि भाऊ बलराम गर्भगृहातून बाहेर पडतात.
आषाढ शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला म्हणजे 1 जुलै 2022 रोजी रथयात्रेला निघेल. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा तीन रथांवर बसून त्यांच्या मावशीच्या गुंडीचा मंदिरात जातील.