PAN Card Update : आधार कार्डद्वारे बदलू शकता पॅन कार्डचा अॅड्रेस; काय आहे प्रक्रिया समजून घ्या
आधार आणि पॅन कार्डच्या मदतीने तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवता येऊ शकतो. याशिवाय इतर अनेक कामासाठी या दोन्ही ओळखपत्रांची गरज लागते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्याला आयकर विभागाकडून पॅन कार्ड दिलं जातं, तर आधार कार्ड यूआयडीएआय यांच्याकडून देण्यात येतं. या दोन्ही कार्डमध्ये काही बदल करायचा असेल, तर तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.
तुम्हाला पॅन कार्डचा बदलण्यासाठी UTIITSL(UTI Infrastructure Technology And Services Limited)च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे.
तुम्हाला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी किंवा करेक्शनचा पर्याय निवडावा लागेल. आता पॅन कार्ड डिटेल या पर्यायाची निवड करून नेक्स्टवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक टाईप करून टाकावा लागेल.
पुढे तुम्हाला आधार ई-केवायसी अॅड्रेस अपडेटचा पर्याय निवडावा लागणार आहे. ही सर्व माहिती अपडेट केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी देण्याची आवश्यकता आहे. सर्व माहिती सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी क्रमांक टाकून पुन्हा सबमिट करा.
या सारखंच तुम्हाला आधार कार्डमध्ये तुमचा राहण्याचा पत्ता अपडेट करायचं असेल, तर आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रोसेस पूर्ण करू शकता.
आधार आणि पॅन कार्ड हे अत्यंत महत्वाच्या कागपत्रांपैकी एक आहेत. यापैकी पॅन कार्डचा वापर तुम्हाला बँकेच कर्ज घेण्यासाठी, आयटीआर फाइल करण्यासाठी आणि जास्तीत पैशाचा व्यवहार करण्यासाठी केला जातो.