Padma Awards: पद्म पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील आठ जणांचा सन्मान
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यामध्ये चार जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण तर 107 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्रातील एकूण 10 जणांचा यामध्ये समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपद्मविभूषण : ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण : शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेल्या राधेशाम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण : हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग (मरणोत्तर) यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पद्मभूषण : सीरम इन्स्टिस्ट्यूटचे संस्थापक सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
पद्मभूषण : नटराजन चंद्रशेखरन यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
पद्मश्री : डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना मेडिसीन क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे
पद्मश्री : विजयकुमार डोंगरे यांना मेडिसीन क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
पद्मश्री : लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
पद्मश्री : गायक सोनू निगम याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
पद्मश्री : विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रातील कामगिरीबद्ल अनिल राजवंशी यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.
पद्मश्री : भिमसेन सिंगल यांना मेडिसीन क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.