Odisha Train Accident : ओडिशामध्ये आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याची धडपड! ट्रेनचा ढिगारा हटवला, ट्रॅक दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर
सुमारे 1000 हून अधिक मजूर दुरुस्तीच्या कामात गुंतले आहे. अपघातग्रस्त ट्रेनच्या बोगी हटवण्यात आल्या असून एका बाजूने ट्रॅक जोडण्याचं काम सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम लवकरात लवकर पूर्ण करून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ओडिशातील बालासोरमधील बहानगा रेल्वे स्टेशनजवळ तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
विरोधी पक्षांनी आता रेल्वेच्या 'कवच संरक्षण' प्रणालीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
ट्रेनमधील अपघात टाळण्यासाठी 'कवच' संरक्षण प्रणालीचा शोध लावण्यात आला. पण ही प्रणाली अद्याप सर्व ट्रेनमध्ये बसवण्यात आलेली नाही.
घटनास्थळी ट्रेनचे अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. या मार्गावरील 90 ट्रेन रद्द करण्यात आल्या असून इतर 46 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
आज, 4 जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ओडिशामधील परिस्थितीचा आढावा घेऊन जखमींची विचारपूस करणार आहेत.
सध्या रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु असून सोमवारी, 5 जूनपर्यंत रेल्वे ट्रॅक दुरुस्त होण्याची शक्यता आहे.