New Parliament Building : आतून अशी दिसते संसदेची नवी इमारत, 28 मे रोजी होणार उद्धाटन, पाहा फोटो
संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्धाटनाचा मुहूर्त ठरला असून 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या इमारतीचं उद्धाटन होणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही माहिती दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील. लोकसभेचे एक हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था आहे.
सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत, नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक असणार आहेत.
या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल.
याशिवाय या नव्या संसदेत 120 कार्यालयं, म्युझियम, गॅलरीही असणार आहे.
नवीन संसद भवनातील लोकसभेच्या तळाचा आराखडा राष्ट्रीय पक्षी मोर या थीमवर ठेवण्यात आला आहे. नवीन इमारत जुन्या संसद भवनापेक्षा 17,000 चौरस मीटर मोठी आहे.
ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे, तिचे डिझाइन 'HCP डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड' ने तयार केले आहे. त्याचे शिल्पकार विमल पटेल आहेत.
एकूण 13 एकरावर नवीन इमारत बांधली गेली आहे. हे राष्ट्रपती भवनापासून हाकेच्या अंतरावर आहे.
सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या चार मजली नवीन संसद भवनात लाउंज, लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नव्या संसदेच्या इमारतीचं कंत्राट टाटा प्रोजेक्ट्सला 2020 मध्ये 861.9 कोटी रुपयांना देण्यात आले होते. त्याची किंमत नंतर वाढवून सुमारे 1,200 कोटी रुपये करण्यात आली.