Nepal Pashupatinath temple: पशुपतीनाथ मंदिरातून 10 किलो सोने गायब,नेपाळ सरकारच्या सीआयएकडून सोन्याचा तपास सुरू
नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातून तब्बल 10 किलो सोनं गायब झालंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयानंतर चोरीच्या तपासासाठी भ्रष्टाचारविरोधी संस्थेने मंदिर परिसराचा ताबा घेतला.
त्यामुळे रविवारी पशुपतीनाथाचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं.
पशुपतीनाथ मंदिराने जलहरी बनवण्यासाठी 103 किलो सोने खरेदी केले होते
पण या दागिन्यांमधून 10 किलो सोने गायब झालेत.
तपास प्रक्रियेसाठी नेपाळ लष्कराच्या जवानांसह अनेक सुरक्षा कर्मचारी पशुपती मंदिर परिसरात तैनात करण्यात आले आहेत.
भ्रष्टाचारविरोधी संस्थेने पशुपतीनाथांच्या सोन्याने बनवलेल्या जलाहरीचा दर्जा आणि वजन निश्चित करण्यासाठी ताब्यात घेतले आहे.
पशुपतीनाथ मंदिर हे काठमांडूमधील सर्वात जुने हिंदू मंदिर आहे.
10 किलो सोने गहाळ झाल्याच्या अहवालानंतर संसदेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सरकारने सीआयएए या आयोगाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.
CIAA ही भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणारी नेपाळ सरकारची सर्वोच्च घटनात्मक संस्था आहे.