Vande Bharat Express : देशात 10 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार,महाराष्ट्रात 'या' मार्गावर सेवा सुरु होणार
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार वंदे भारत एक्स्प्रेस झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, कर्नाटक, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये नव्या गाड्या सुरु होणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेल्वे 10 नव्या वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करणार आहे. झारखंडमधील जमशेदपूर येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबर रोजी विविध राज्यांमधील वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवतील.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती दिली.
टाटानगर-पाटणा, वाराणसी-देवघर, टाटानगर-ब्रह्मपूर, रांची-गोड्डा, आग्रा- बनारस, हावडा-गया, हावडा- भागलपूर, दुर्ग-विशाखापट्टणम, हुबळी-सिकंदराबाद, पुणे-नागपूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे.
पुणे- नागपूर मार्गावर सध्या 9 एक्स्प्रेस धावतात. पुणे नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमुळं विदर्भातील प्रवाशांना पश्चिम महाराष्ट्रात येण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.