India Monsoon: पावसाचा धुमाकूळ! दिल्ली-मुंबई जलमय, हिमाचलमध्ये भूस्खलन; पाहा फोटो
काही राज्यांमध्ये सातत्याने पाऊस पडत आहे. कुठे दरड कोसळली आहे, तर कुठे ढगफुटीच्या घटनाही घडल्या आहेत. तर, अनेक भागात पाणी साचलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिमाचल प्रदेशात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, भूस्खलनासोबतच ढगफुटी झाल्याने लोकांसमोर समस्या निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. अनेकांच्या घरांचं, गाड्यांचं नुकसान झालं आहे.
उत्तराखंडमधील लोकांवर पावसाने आघात केला आहे. पावसामुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती ओढावली आहे. हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.
दिल्लीमध्ये संततधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दिल्ली रेल्वे स्थानकात पावसामुळे करंट लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
चंदीगड-मनाली महामार्गावर सततच्या पावसामुळे भूस्खलन होत आहे. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
मुंबईतही पावसाचं आगमन झालं आहे. मुंबईत दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.