Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manipur Violence: मणिपूरमध्ये आदिवासी समूदायाच्या मोर्चानंतर हिंसाचार, हिंसा नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण
मणिपूरमध्ये मैतेई समूदायाचा अनुसूचित जमाती (ST) श्रेणीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला विरोध करत बुधवारी (3 मे) मणिपूरमधील आदिवासी गटांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआदिवासी आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला असून त्यानंतर आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मैईती समाजाचा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या संघटनेने पुकारलेल्या 'आदिवासी एकता मार्च' दरम्यान हिंसाचार उसळला होता.
या दरम्यान, चुरचंदपूर येथे तणावाचे वातावरण असताना जमावाने घरांची तोडफोड केली. ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर (ATSUM) ने सांगितले की मैतेई समूदायाचा एसटी श्रेणीमध्ये समावेश करण्याची मागणी जोर धरत आहे, त्याविरोधात त्यांनी मोर्चा काढला आहे.
मणिपूरमधील आदिवासी आंदोलनानंतर झालेल्या हिंसाचारामुळे तेथे संचारबंदी लागू आहे. इम्फाळ, चुराचंदपूर आणि कांगपोकपी येथे हिंसाचार भडकल्यानंतर बुधवारी रात्री मणिपूरच्या आठ जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
गुरुवारी (4 मे) इंफाळच्या काही भागांतून हिंसक घटना घडल्या. हे थांबवण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलाला पाचारण करण्यात आले आहे.
हिंसाग्रसत् भागातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सशस्त्र दलाने येथे फ्लॅग मार्च काढला. त्याचबरोबर हिंसाचारग्रस्त भागात लष्कराने फ्लॅग मार्चही काढला.
राज्य सरकारने येथे मोबाईल इंटरनेटवर बंदी घातली आहे. या घटनेनंतर राज्यातील विविध भागातील 7,500 हून अधिक लोकांनी लष्कराच्या छावण्या आणि सरकारी कार्यालयांमध्ये आश्रय घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. यादरम्यान आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये हिंसाचार झाला.