Makeup Side Effects : सुंदर दिसण्यासाठी करायला गेली मेकअप, पण घडलं भलतंच; थेट रुग्णालयात भरती करण्याची वेळ, लग्नही मोडलं
ब्रायडल मेकअपसाठी (Bridal Makeup) ब्युटी पार्लर आणि ब्युटीशियन हजारो रुपये घेतात. तरुणींची मेकअपच्या बाबतीत खास अपेक्षा असतात. हीच अपेक्षा एका तरुणीला महागात पडली आहे. ( Image Source : istockphoto )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका तरुणीला लग्नासाठी मेकअप करणं चांगलंच महागात पडलं आहे. मेकअपमुळे तरुणीची तब्येत एवढी बिघडली की, तिला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. ( Image Source : istockphoto )
IANS च्या रिपोर्टनुसार, कर्नाटकातील एका तरुणीला मेकअप केल्यामुळे थेट रुग्णालय गाठावं लागलं आहे. ( Image Source : istockphoto )
मेकअप केल्यानंतर मुलीचा चेहरा इतका बिघडला की तिला अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावं लागलं. इतकंच नाही तर यामुळे तिचं लग्नही पुढे ढकलण्यात आलं. ( Image Source : istockphoto )
हे प्रकरण समोर आल्यानंतर तरुणीचा मेकअप करणाऱ्या ब्युटीशियनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. ( Image Source : istockphoto )
विशेष बाब म्हणजे ज्या ब्युटी पार्लरमधून पीडित तरुणीने मेकअप करुन घेतला ते हर्बल ब्युटी पार्लर होतं. ( Image Source : istockphoto )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कर्नाटकातील जाजूर गावची रहिवासी आहे. पीडितेने 10 दिवसांपूर्वी शहरातील गंगाश्री हर्बल ब्युटी पार्लर अँड स्पामध्ये मेकअप ट्रीटमेंट करुन घेतली होती. ( Image Source : istockphoto )
मेकअप केल्यानंतर पीडितेचा चेहरा काळा पडला आणि चेहऱ्यावर सूज आली. त्यानंतर पीडितेचा चेहरा इतका सुजला की तिला रुग्णालयात ICU मध्ये दाखल करावं लागलं. शुक्रवारी (3 मार्च) ही घटना उघडकीस आली. ( Image Source : istockphoto )
पीडितेने सांगितलं की, तिच्या चेहऱ्यावर नवीन प्रकारचे मेकअप प्रॉडक्ट्स लावले होते. पण मेकअप ट्रीटमेंट केल्यानंतर पीडितेला अॅलर्जी झाली आणि तिचा चेहरा इतका खराब झाला की तिचे लग्न पुढे ढकलण्यात आलं. ( Image Source : istockphoto )
दरम्यान, इंडिया टुडेच्या बातमीनुसार, या घटनेनंतर वर पक्षाने हे लग्न मोडलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नवरीला सुंदर दिसण्यासाठी काहीतरी नवीन करुन बघायचं होतं. यामुळे ती ब्युटी पार्लरमध्ये गेली. ( Image Source : istockphoto )
ब्युटीशियनने नवरीच्या चेहऱ्यावर आधी फाऊंडेशन लावलं. त्यानंतर नवरीने स्टीमही घेतली. यामुळे नवरीच्या चेहऱ्यावर रिअॅक्शन झाली. तिचा चेहऱ्या भाजल्याप्रमाणे काळवंडला आणि सुजला. तिची प्रकृती फार खरा झाल्याने तिला ICU मध्ये दाखल करावं लागलं. ( Image Source : istockphoto )