काश्मीरमधील डोडामध्ये जमीन खचण्याचे प्रकार (land subsidence), भयभीत गावकऱ्यांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील नई बस्ती गावात जमीन खचण्याचे प्रकार होत आहेत. डोडा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून नई बस्ती हे गाव 35 किलोमीटरवर आहे. म्हणजे हा परिसर चिनाब नदीच्या खोऱ्यातील. हा प्रदेश पहिल्यापासून म्हणजे 1988 आधी जमीन खचणारा म्हणून ओळखला (subsidence-prone zone) जायचा. पण गेल्या अनेक वर्षांपासून एवढ्या भीषण पद्धतीने जमीन खचलेली नाही. त्यामुळे या परिसरात नवी बांधकामे झाली. घराची वस्ती झाली, त्यालाच नई बस्ती अशी ओळख मिळाली. (PTI फोटो)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनई बस्ती गावातील हे दुमजली घर अशा पद्धतीने खचलंय की आता त्याची पुनर्बांधणीही शक्य नाही. या घरातील लोकांना कायमचं विस्थापीत व्हावं लागलं आहे (PTI फोटो)
भूगर्भातील हालचालीमुळे जमीन खचते. डोडा जिल्ह्यातील हा गावकरी आपल्या घराची अवस्था दाखवत आहे. उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये राहती घरे जशी खचली तसाच हा प्रकार आहे. (PTI फोटो)
चांगल्या रंगरंगोटी केलेल्या घराची ही बाहेरची बाजू दाखवणारा गावकरी. 1 फेब्रुवारीपासून या परिसरात जमीन खचण्याचे प्रकार सुरु आहेत. प्रशासनाने तब्बल 300 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. (PTI फोटो)
डोडा जिल्ह्यातील नई बस्ती गावात कधी कोणत्या घराखालील जमीन धसेल हे सांगता येत नाही. सध्या गावातीलच एका मदरशात भयभीत गावकऱ्यांना आश्रय घ्यावा लागला आहे. (PTI फोटो)
प्रशासनाने सर्व नई बस्ती गावाला सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतल्याने रहिवाशांनी आपल्या घरातील आवश्यक सामानाची बांधाबांध सुरु केलीय. कारण कधी कोणत्या घराखालील जमीन खचेल आणि घरासह माणसेही जमीन गाडली जातील याची भिती सगळ्यांच्या मनात आहे. (PTI फोटो)
या परिसरात दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि वाणसामान-कपड्यांसारख्या वस्तूंचे गाठोडे घेतलेली लोकं सगळीकडे दिसतात. सगळ्यांनाच पोहोचयाचं आहे सुरक्षित स्थळी. जिथे किमान जमीन खचणार नाही. (PTI फोटो)
काश्मीर मधील चिनाब नदीचं खोरं म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली सौंदर्याची उधळणं.. पण आधी दहशतवादाने आता जमीन खचण्याच्या प्रकोपाने हा भागही शापित नंदनवन झाला आहे. (PTI फोटो)
जोशीमठ आणि उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग वगैरे परिसरात जमीन खचण्याचे प्रकार झाल्यानंतर अनेक देशी-विदेशी पत्रकारांनी तिकडे गर्दी केली. आता डोडामध्येही अशीच स्थिती आहे. घराचे तडे गेलेल्या भिंती जगाला दाखवण्यासाठी आलेल्यांना आपली परिस्थिती दाखवल्यावर काहीतरी सरकारी मदत मिळेल ही अपेक्षाही असावी (PTI फोटो)
डोडा जिल्ह्यातील नई बस्तीमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांना फक्त भितीने ग्रासलंय. आपल्याकडे भूकंपानंतर जशी परिस्थिती झाली अगदी तशीच. आता थोडासा जरी धक्का बसला की गावकरी रस्त्यावर पाल टाकून झोपतात. तसाच प्रकार डोडातल्या नई बस्ती भागात आहे. इथले गावकरी आता आपल्या घरात जायला तयार नाहीत. प्रशासनाने भूगर्भ शास्त्रज्ञाचं एक पथक पाठवलं आहे, ते या परिसरातील जमीनींच्या खचण्याच्या कारणांचा शोध घेणार आहे. (PTI फोटो)