IN PICS | तुस्सी ग्रेट हो! जवानांसाठी खऱ्याखुऱ्या ‘रँचो’नं साकारला थंडीपासून बचाव करणारा तंबू
Mahindra & Mahindra उद्योगसमूहाच्या आनंद महिंद्रा यांनीही सोनम वांगचुक यांच्या या शोधाची प्रशंसा केली असून त्यांचं काम हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं म्हटलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलडाखमध्ये जवळपास 12 हजार फुटाच्या उंचीवर देशाच्या संरक्षणार्थ तैनात असणारे जवान अहोरात्र सीमेवर पहारा देत असतात. या भागातील थंडीचा कडाका विचार केला तरीही हुडहुडी भरवणारा. अशा परिस्थितीत है सैनिक मात्र पाय घट्ट रोवून उभे असतात. कशाचीही तमा न बाळगता देशसंरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या या जवानांसाठी आता खऱ्याखुऱ्या रँचोनं म्हणजेच सोनम वांगचुक यांनी एक अनोखा अविष्कार साकारला आहे. हा अविष्कार आहे एका तंबूचा.
तापमानाचा पारा उणे अंशांमध्ये पोहोचला तरीही जवानांना या तंबूत याची किमान जाणिव होणार नाही, अशी या तंबूची रचना.
हा तंबू पर्य़ावरणपूरक असून, सौरउर्जेवर चालतो. शिवाय याचं वजनही फार नाही, त्यामुळं एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासही सोपा. किमान दहा जवान या तंबूत राहू शकतात, असं खुद्द वांगचुक यांनीच फोटो पोस्ट करत सांगितलं आहे.
(सर्व छायाचित्रं- सोनम वांगचुक/ ट्विटर)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -