Krishna Janmashtami 2021 : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेला 'या' पाच गोष्टी हव्यातच
Krishna Janmashtami 2021 : श्रीकृष्ण जन्माष्टमी देशभरात उत्साहानं साजरी केली जाते. येत्या सोमवारी 30 ऑगस्ट रोजी यंदा जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीकृष्ण जन्माष्टमीची विधिपूर्वक पूजा केल्यानं मनोकामना पूर्ण होतात. या पूजेसाठी या पाच गोष्टी असणं आवश्यक मानलं जातं. त्या पाच गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊयात...
दही, दूध, लोणी या भगवान श्रीकृष्णाच्या सर्वात आवडत्या गोष्टी
बाळ गोपालास पंचामृताचा भोग लावला जातो. प्रसाद म्हणून पंचामृतात मेवा, दूध, दही, तूप, गंगाजल आणि मध मिसळलं जातं.
यात महत्वाचं आहे लोणी. भगवान श्रीकृष्णाला सर्वात आवडतं होतं लोणी. बाळ कृष्णाच्या अनेक लीलांमध्ये याचा उल्लेख आढळतो.
शास्त्रांमधील उल्लेखानुसार कृष्णाला बासूरी खूप प्रिय होती. म्हणून पूजेवेळी बासूरी ठेवली जाते.
जन्माष्टमी दिवशी भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पूजा देखील केली जाते. श्रीकृष्णाला तुळस अतिप्रिय होती, त्यामुळं पूजेत तुळशीचं महत्व अधिक आहे.
भगवान श्रीकृष्ण आपल्या मुकुटामध्ये नेहमी मोरपंख ठेवायचे. त्यामुळं या पूजेत मोरपंखाचे महत्व आहे. मोरपंख ठेवणं शुभ मानलं जातं.