Khelo Indiaखेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राची तब्बल 158 पदकांची लयलूट!
तब्बल 57 सुवर्ण, 48 रौप्य व 53 कांस्य अशी एकूण 158 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने आम्हाला ‘नंबर वन’ का म्हणतात हे पुन्हा दाखवून दिले. (Photo Credit : twitter/kheloindia)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआतापर्यंत झालेल्या सहा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने ४ वेळा सर्वसाधारण विजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला असून, हरियाणा संघाने दोन वेळा हा बहुमान मिळविलेला आहे. (Photo Credit : twitter/kheloindia)
यजमान तामिळनाडू संघाने घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवित 38 सुवर्ण, 21 रौप्य, 39 कांस्य अशी एकूण 98 पदके जिंकून उपविजेतेपद पटकाविले. (Photo Credit : twitter/kheloindia)
हरियाणा संघाला पदक तालिकेत तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांनी 35 सुवर्ण, 22 रौप्य व 46 कांस्य अशी एकूण 103पदकांची कमाई केली.(Photo Credit : twitter/kheloindia)
महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी महाराष्टातील मुले मुली या दोन्ही गटात सांघिक विजेतेपद पटकवले आहे (Photo Credit : twitter/kheloindia)
शेवटच्या दिवसात ऋषभ दास यांने यंदाच्या स्पर्धेतील ५० मीटर्स प्रीस्टाईल शर्यत २४.२२ सेकंदात पार केली आणि या स्पर्धेतील यंदाचे चौथे सुवर्णपदक जिंकले.(Photo Credit : twitter/kheloindia)
पाठो पाठ रिले शर्यतीतील महाराष्ट्रातील सुवर्ण पदक जिंकून दिल आहे सुवर्ण पदकाची संख्या पाच केली आहे (Photo Credit : twitter/kheloindia)
तो नवी मुंबई येथील असून आजपर्यंत त्याने राष्टीय स्तरावर अनेक पदक जिंकले आहे (Photo Credit : twitter/kheloindia)
ऋषभ याने अथर्व संकपाळ, रोनक सावंत व सलील भागवत यांच्या साथीत चार बाय शंभर मीटर्स रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. ही शर्यत त्यांनी तीन मिनिटे ३५.५२ सेकंदात पूर्ण केली. मुलींच्या गटात निर्मयी अंबेटकर हिने २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत कांस्यपदक जिंकताना दोन मिनिटे २६.९१ सेकंद वेळ नोंदवली.(Photo Credit : twitter/kheloindia)
तिची सहकारी अलिफिया धनसुरा हिने ५० मीटर्स प्रâीस्टाईल शर्यत २७.०७ सेकंदात पार केली आणि सुवर्ण पदक जिंकले. हिबा चौगुले हिने ५० मीटर्स शर्यतीत रुपेरी कामगिरी करताना ३४.९४ सेकंद वेळ नोंदविली.(Photo Credit : twitter/kheloindia)