Telangana : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 125 फुटी भव्य पुतळा, हैदराबादमध्ये मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते अनावरण
तेलंगणाचे मुख्यमंत्री (Chief minister of Telangana) के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा भव्य पुतळा राज्य सचिवालयाच्या शेजारी आहे.
राज्य सचिवालयाशेजारी उभारण्यात आलेला हा पुतळा हा भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी. राव यांनी सांगितलं की, ''2024 च्या लोकसभा निवडणुकीत आमचं सरकार येईल. त्यांचा पक्ष सत्तेत आल्यानंतर दलित बंधू योजना संपूर्ण देशात लागू केली जाईल.''
राज्य सचिवालयाशेजारी बुद्ध पुतळ्यासमोर आणि तेलंगणा हुतात्मा स्मारकाशेजारी असलेला आंबेडकरांचा भारतातील सर्वात उंच पुतळा लोकांना आणि संपूर्ण राज्य प्रशासनाला दररोज प्रेरणा देईल, असं मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फूट उंच पुतळ्याच्या अनावरणासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या अनावरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
पुतळ्याच्या अनावरणासाठी क्रेनच्या साहाय्याने मोठा पडदा हटवण्यात आला.
मोठ्या संख्येने बौद्ध भिक्खू या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी विविध संगीत आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.