ISRO : भारत नव्या भरारीसाठी सज्ज! इस्रो PSLV-C56 रॉकेटद्वारे सहा सॅटेलाईट करणार लाँच
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) 30 जुलैला पीएसएलव्ही (PSLV) रॉकेटद्वारे सिंगापूरच्या सात उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, PSLV-C56 कोडनेम असलेले PSLV रॉकेटमधून सिंगापूरच्या DS-SAR उपग्रहासह सात उपग्रहांचं प्रक्षेपण केलं जाईल.
सिंगापूरचा DS-SAR उपग्रह सुमारे 360 किलो वजनाचा आहे. तर, इतर सहा छोटे उपग्रह नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी असून त्यांची नावे VELOX-AM, ARCADE, SCOOB-II, NULLION NU, Galasia-2 आणि ORRB-12 STRIDER अशी आहेत.
चांद्रयान-3 नंतर इस्रोचे नवीन मोहीमेसाठी सज्ज झालं आहे. सहा उपग्रहांसह PSLV-C56 30 जुलैला अवकाशात प्रक्षेपित केलं जाईल.
इस्रो 30 जुलै रोजी DS-SAR सॅटेलाईट आणि सहा सह-प्रवासी उपग्रहांसह PSLV-C56 मोहीम प्रक्षेपित करणार आहे.
न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) च्या सहकार्याने ही मोहीम पार पाडली जाईल.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) 30 जुलैला पीएसएलव्ही (PSLV) रॉकेटद्वारे सिंगापूरच्या सात उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, PSLV-C56 कोडनेम असलेले PSLV रॉकेटमधून सिंगापूरच्या DS-SAR उपग्रहासह सात उपग्रहांचं प्रक्षेपण केलं जाईल.
पीएसएलवी-सी56 द्वारे सहा सह-प्रवासी उपग्रह प्रक्षेपित केले जातील. यामध्ये वेलॉक्स-एएम (Velox-AM), आर्केड (Arcade), स्कूब-II (Scoob-II), न्यूलायन (NewLion), गॅलासिया-2 (Galacia-2) आणि ओआरबी-12 स्ट्राइडर (ORB-12 Strider) यांचा समावेश आहे.
यासोबत इस्रो आणखी एका मोहीमेची तयारी करत आहे. इस्त्रोकडून गगनयानच्या इंजिनची चाचणी यशस्वी झाली आहे. इस्रोने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. गगनयान हे भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल