Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून धुक्याबाबत अलर्ट जारी; तुमच्या शहरातील हवामान कसे असेल?
हवामान खात्याने देशात विविध ठिकाणी कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी बिहार आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले. (Photo Credit : Pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीचा सामना करतोय. उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये धुक्याचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.(Photo Credit : Pexels)
पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानच्या काही भागात पुढील 2 दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. (Photo Credit : Pexels)
त्यानंतर या ठिकाणची थंडी हळूहळू कमी होईल. पुढील दोन दिवसांत वायव्य भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.(Photo Credit : Pexels)
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी (शुक्रवार) रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर प्रदेशच्या विविध भागात दाट धुके राहील. या कालावधीत, दृश्यमानता 50 मीटरपेक्षा कमी असणे अपेक्षित आहे.(Photo Credit : Pexels)
IMD नुसार, 5 जानेवारी 2024 रोजी पूर्व राजस्थानच्या काही भागात आणि 6 जानेवारी 2024 च्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी राज्याच्या विविध भागात दाट ते खूप दाट धुके असेल. या कालावधीत, येथे दृश्यमानता देखील 50 मीटरपेक्षा कमी असेल.(Photo Credit : Pexels)
देशाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच केरळमध्ये ५ जानेवारीला आणि तामिळनाडूमध्ये ७ जानेवारीला मुसळधार पाऊस पडू शकतो. (Photo Credit : Pexels)
8 जानेवारी आणि 9 जानेवारी रोजी पश्चिम हिमालयीन प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.(Photo Credit : Pexels)
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडच्या पूर्व भागात 3°C ते 6°C पर्यंत किमान तापमान नोंदवले गेले. (Photo Credit : Pexels)
तसेच बिहार, ओडिशा आणि त्रिपुरामध्ये ६ जानेवारीला सकाळी काही तास दाट धुके राहील. येथे 50-200 मीटर दृश्यमानता असेल.(Photo Credit : Pexels)