Nehru Museum Renamed: नेहरू संग्रहालयाचे नामांतर, 9 वर्षात मोदी सरकारने केला संग्रहालयाचा कायापालट
मोदी सरकारने शुक्रवार, 16 जून रोजी दिल्लीतील त्रिमूर्ती भवन परिसरातील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे नाव बदलले. आता त्याचं नाव पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय असं करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App28 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रपती भवन येथील 'मुघल गार्डनचे' नाव बदलून 'अमृत उद्यान'करण्यात आलं होतं. या उद्यानात अनेक प्रकारचे गुलाब, ट्यूलिप आणि हंगामी रंगीबेरंगी फुले आहेत. यामुळे उद्यानाला भव्य आणि सुंदर स्वरूप प्राप्त होतं. हे अमृत उद्यान प्रत्येक वसंत ऋतुमध्ये लोकांनी बघण्यासाठी उघडलं जातं.
8 सप्टेंबर 2022 रोजी दिल्ली येथील राजपथाचं नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आलं होतं. याचे पंतप्रधान मोदींनी उद्धाटन केलं होतं. दरवर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनाची परेड याच राजपथावरून निघते. या परिसराला ब्रिटीशकालीन भारतात किंग्सवेच्या नावाने ओळखलं जात होतं.
2015 मध्ये दिल्ली येथील रेसकोर्स रोडचं नाव बदलून लोक कल्याण मार्ग असं करण्यात आलं होतं. याच मार्गावर पंतप्रधानांचं आवास आहे. याच वर्षी औरंगजेब रोडचं नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम मार्ग करण्यात आलं होतं. 2017 मध्ये डलहौसी रोडचं नाव बदलून दारा शिकोह मार्ग असं करण्यात आलं.
दिवंगत माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या स्मरणार्थ दिल्लीच्या फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं. 12 सप्टेंबर 2019 रोजी त्याचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असं करण्यात आलं होतं. 24 ऑगस्ट 2019 रोजी अरूण जेटली यांचं निधन झालं.
जानेवारी 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज असं करण्यात आलं. प्राचीन काळात या शहराचं नाव प्रयागराज होतं. पण मुघल शासक अकबराच्या काळात त्याचं नाव अलाहाबाद ठेवण्यात आलं होतं. प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा पवित्र संगम होतो. याचं ठिकाणी कुंभमेळा आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त भाविक मोठ्या संख्येनं भाविक जमतात.
2018 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने अलाहाबाद शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान फैजाबाद जिल्ह्याचं नाव बदलून अयोध्या करण्याचा निर्णय घेतला होता. अयोध्या ही रामाची जन्मभूमी असून तिथं रामाचं भव्य मंदिर उभारण्यात येतं आहे.
5 ऑगस्ट 2018 मध्ये उत्तर प्रदेशमधील मुघलसराय जंक्शनचं नाव बदलून 'पंडित दीन दयाळ उपाध्याय जंक्शन' करण्यात आलं होतं. यासोबत मुघलसराय शहराचं नाव बदलून पंडित दीन दयाळ उपाध्याय नगर करण्यात आलं होतं.
12 एप्रिल 2016 मध्ये हरियाणाच्या गुडगाव शहराचं नाव गुरूग्राम असं करण्यात आलं होतं.
7 फेब्रुवारी 2022 रोजी मध्य प्रदेशच्या होशंगाबाद जिल्हाचं नाव नर्मदापुरम करण्यात आलं होतं. होशंगाबाद जिल्ह्यापासून जवळ असणाऱ्या 'बाबई' शहाराचं नाव बदलून माखन नगर करण्यात आलं होतं. महान कवी माखन लाल चतुर्वेदी यांचं बाबई हे जन्मस्थळ आहे. आता बाबईचं नाव बदलून माखनलाल चतुर्वेदी करण्यात आल आहे.
2017 मध्ये इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या नावावरून 'इंदिरा गांधी सेंटर ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं' नाव मोदी सरकरने निर्णय घेतला होता. याचं नाव बदलून'ऑक्सफोर्ड इंडिया सेंटर सस्टेनेबल डेव्हलपमेंट' असं नाव करण्यात आलं.
6 ऑगस्ट 2021 रोजी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारचं नाव बदलण्यात आले आणि त्याचं मेजर ध्यानंचंद खेलरत्न पुरस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.