अचानक ठरलं, तिकीट काढलं; सुरक्षेच्या लवाजम्यासह मोदींचा सर्वसामान्यांसोबत मेट्रो प्रवास
पंतप्रधान मोदी आधी गाडीनं दिल्ली युनिवर्सिटीत जाणार होते. पण अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी दिल्ली युनिवर्सिटीपर्यंत मेट्रोनं जाण्याचा निर्णय घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांसोबत बसून आणि त्यांच्याशी गप्पागोष्टी करत मेट्रोतून प्रवास केला.
असं असलं तरिही मोदींनी सुरक्षेच्या संपूर्ण लवाजम्यासह मेट्रोनं प्रवास केलाय.
मोदींना हा मेट्रो प्रवास तिकीट काढून केलाय. सर्वात आधी मोदींनी मेट्रोच्या वन कार्डमार्फत एन्ट्री केली आणि त्यानंतर मेट्रोल प्रवास केला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील युनिवर्सिटीच्या शताब्दी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मेट्रोनं प्रवास केला.
दिल्ली युनिवर्सिटीला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. याचनिमित्तानं शताब्दी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ब्रिटिश काळात 1 मे 1922 रोजी दिल्ली युनिवर्सिटीची स्थापना झाली होती.
1978 मध्ये पंतप्रधान मोदींनी दिल्ली युनिवर्सिटीतून बीए केलं होतं. 6 फेब्रुवारी 2013 रोजी मोदींनी एसआरएसीसी कॉलेजमध्ये भाषणही केलं होतं.