PM Modi : ग्रीसकडून पंतप्रधान मोदींना 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर' देऊन सन्मानित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कतरिना एन साकेल्लारोपौलो यांच्या हस्ते प्रतिष्ठित 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर' प्रदान करण्यात आला. यासह हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले विदेशी सरकार प्रमुख ठरले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा सन्मान ग्रीसच्या राष्ट्रपतींकडून अशा पंतप्रधानांना आणि प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जातो ज्यांनी त्यांच्या विशेष स्थानामुळे ग्रीसचा दर्जा वाढवण्यात हातभार लावला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींना राष्ट्रपती सकेलारोपोलू यांच्या हस्ते ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला.
पंतप्रधान मोदींनी अथेन्समधील सैनिकाच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करून ग्रीसमधील कार्यक्रमांना सुरुवात केली.
'X' वर एका पोस्टमध्ये कार्यक्रमाचे छायाचित्र शेअर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, यावरून ग्रीसच्या लोकांचा भारताप्रती असलेला आदर दिसून येतो. परराष्ट्र मंत्रालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत-ग्रीस भागीदारीची ताकद दर्शविणारा हा विशेष सन्मान आहे.
त्यांना दिलेल्या प्रशस्तीपत्रात म्हटले, की मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या देशाचे स्थान उंचावले आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी ते काम करत असून सुधारणांसाठी धाडसी निर्णय घेत आहेत.
ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनरची स्थापना 1975 मध्ये झाली. ताऱ्याच्या चेहऱ्यावर देवी एथेनाचे चित्र कोरलेले आहे. त्यावर ‘फक्त श्रीमंतांचाच सन्मान केला पाहिजे’ असा मजकूर कोरला आहे.
गेल्या 40 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ग्रीस भेट आहे. सप्टेंबर 1983 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ग्रीसला भेट दिली होती.