INS Vagir: 7000 किमी अंतर कापत भारताची INS वागीर ऑस्ट्रेलियात दाखल
पाणबुडीला ऑस्ट्रेलियाला पोहचण्यासाठी 7000 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यादरम्यान आयएनएस वागीर ऑस्ट्रेलियच्या पश्चिम किनाऱ्यावर रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीसह विविध सरावांमध्ये सहभागी होणार नाही
भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीमधील संयुक्त सरावामुळे समन्वय आणि सहकार्य वाढणार आहे.
आयएनएस वागीरची तैनात ही भारतीय नौदनालाने ऑस्ट्रेलियात केलेले पहिली तैनात आहे.
'आयएनएस वागीर' पाणबुडी एक आधुनिक डिझेल-इलेक्ट्रिक अटॅक सबमरीन आहे
कलावरी श्रेणीच्या पहिल्या तुकडीतील सहा पाणबुड्यांपैकी ही एक पाणबुडी आहे. वागीरला 'सायलेंट किलर शार्क' असे देखील म्हणतात.
पाणबुडी शत्रूला चकवा देण्यात आणि हल्ला करण्यात सक्षम आहे. तसेच शत्रूला सुगावाही न लागता हल्ला करणे हे पाणबुडीचे वैशिष्ट्य आहे.
आयएनएस वागीर समुद्रात भूसुरुंग टाकण्यास सक्षम आहे. ही 350 मीटर खोलीवर तैनात केली जाऊ शकते
फ्रेंच स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली 'आयएनएस वागीर' (INS Vagir) ही पाणबुडी जानेवारी महिन्यात नौदलात दाखल झाली