Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrayaan 3 Landing: एस. सोमनाथ, एम. शंकरन यांच्यासह भारताच्या चंद्रयान-3 मिशनमध्ये 'या' शास्त्रज्ञांचं मोलाचं योगदान
चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा भारताचा हा दुसरा प्रयत्न आहे. चंद्रावर चांद्रयानाच्या लँडिंगसाठी अवघे काहीच तास शिल्लक आहेत. तत्पूर्वी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि इतर प्रमुख शास्त्रज्ञांनी तिरुपती मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली. तसेच, यावेळी त्यांनी चंद्रयान-3 चं मॉडेलही चंद्राला भेट दिलं. चांद्रयान 3 च्या मोहीमेत अनेक शास्त्रज्ञांचं मोलाचं योगदान आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएस. सोमनाथ (S Somanath) : इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ हे भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेचे मास्टरमाइंड, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सोमनाथ यांनी इस्त्रोचा पदाभार स्विकारल्यापासून चांद्रयान-3, आदित्य-एल1 (सन मिशन) आणि गगनयान यांसारख्या महत्त्वाच्या मोहिमांना गती मिळाली आहे.
पी वीरमुथुवेल (P Veeramuthuvel), प्रकल्प संचालक, चांद्रयान-3 : पी वीरमुथुवेल यांनी 2019 मध्ये चांद्रयान-3 प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी सध्याच्या इस्रो मुख्यालयातील अंतराळ पायाभूत सुविधा कार्यक्रम कार्यालयात उपसंचालक म्हणून काम केलं आहे. वीरमुथुवेल यांनी चांद्रयान-2 मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली होती.
एस उन्नीकृष्णन नायर ( S Unnikrishnan Nair), संचालक, विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC): एस उन्नीकृष्णन नायर हे VSSC चे प्रमुख आणि LVM3 रॉकेटचे निर्माते आहेत. ते आणि त्यांची टीम मिशनच्या विविध आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडाण्यासाठी काम करते.
एम शंकरन (M Sankaran), संचालक UR राव सॅटेलाइट सेंटर (URSC): एम शंकरन हे UR राव सॅटेलाइट सेंटर (URSC) चे संचालक आहेत. हे सेंटर इस्रोसाठी भारताचे सर्व उपग्रह तयार करते. सध्या शंकरन आणि त्यांची टीम देशाच्या गरजा भागवण्यासाठी उपग्रह बनवणाऱ्या टीमला मार्गदर्शन करत आहेत.
ए राजराजन (A Rajarajan), चेअरमन, लॉन्च ऑथोरायझेशन बोर्ड (LAB): ए राजराजन सध्या सतीश धवन स्पेस सेंटर SHAR (SDSC SHAR), भारताचे प्रमुख स्पेसपोर्ट, श्रीहरिकोटाचे संचालक आहेत. राजराजन हे कंपोझिट क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.
इतर प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये मिशन डायरेक्टर मोहन कुमार यांच्या नेतृत्वाखालील टीमचा समावेश आहे.