Weather Update: देशभर पावसाचा कहर! कुठे भूस्खलन, तर कुठे साचलं पाणी; पाहा देशातील हवामानाची स्थिती चित्रांमध्ये...
हवामान खात्याने देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेकडील 25 राज्यांमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विभागनिहाय अरुणाचल प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तराखंडमध्ये चंबा, उत्तरकाशी, रुद्रप्रयागमध्ये पावसाची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे, त्यामुळे उत्तराखंडमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हिमाचल प्रदेशातही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक भागांत मोठं नुकसान होत आहे. मुसळधार पावसामुळे सतलज नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, झारखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, गुजरात प्रदेश, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगडमध्ये पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.
हवामान खात्याने छत्तीसगडमधील 6 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील 8 जिल्ह्यांमध्ये 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कर्नाटक, केरळ, माहे, लक्षद्वीप, पूर्व राजस्थान, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबईतही पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे, त्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत.