India This Week Pics : या आठवड्यातील देशातील महत्त्वाच्या घटना एका क्लिकवर
काँग्रेस पक्षाच्या माजी नेत्या आणि आयआरएस अधिकारी प्रीता हरित यांनी सोमवारी,18 जून रोजी दिल्लीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी,19 जून रोजी व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान व्हॅन गिआंग यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. त्यावेळचा क्षण.
तमिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात मंगळवारी, 20 जून रोजी दोन खाजगी बसगाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या. या अपघातात 2 लोक मृत्यूमुखी पडले असून 70 लोक जखमी झाले.
मंगळवारी, 20 जून रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे चेन्नईत पोहोचले. यावेळी त्यांनी सांगितले की, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए गट सर्व मित्रपक्षांची काळजी घेतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिकेच्या राजकीय दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी, 21 जून रोजी वॉशिंग्टन येथे पोहोचले. यानंतर त्यांचे वॉशिंग्टनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं.
बुधवारी, 21 जून रोजी मोदी वॉशिंग्टनमध्ये पोहोचले. यानंतर त्यांनी योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात ऐतिहासिक कार्यक्रमाचं नेतृत्व केलं.
बुधवारी, 21 जून रोजीच पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जयपूरच्या कारागिरांनी चंदनाच्या लाकडापासून बनवलेला 'दृष्टिसहस्त्रचंद्रो' बॉक्स भेट दिला.
मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेनुसार गुरुवारी, 22 जून रोजी गोरखपूर येथे दीड हजार गरीब मुलींचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.
आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात देशातील 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची पाटण्यात शुक्रवारी, 23 जून रोजी बैठक पार पडली. यावेळी देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
गुरुवारी, 22 जून रोजी जम्मू विद्यापीठात दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित होते.