IN PICS | माता वैष्णोदेवीच्या दरबारावर बर्फाची चादर
जम्मू काश्मीरमधील (jammu kashmir) रेआसी जिल्ल्यात असणाऱ्या आणि अनेक भक्तांसाठी श्रद्धास्थान असणाऱ्या (Mata vaishnodevi shrine) माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात जोरदार बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- पीटीआय)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये तापमान चांगलंच खाली गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं देशभरात खऱ्या अर्थानं थंडीची लाट आली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (छाया सौजन्य- पीटीआय)
फक्त काश्मीरच नव्हे तर, हिमालचमध्ये साठलेल्या बर्फामुळं काहीसं असंच चित्र पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- पीटीआय)
गुलमर्ग आणि पहलगाममध्ये झालेल्या या बर्फवृष्टीमुळं स्थानिक आणि बाहेरील राज्यातून आलेल्या पर्यटकांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- पीटीआय)
गुरेझ, जवाहर बोगदा या भागांमध्येगी बर्फवृष्टी झाली. याचे परिणाम रस्ते वाहतुकीवर झाले. (छाया सौजन्य- पीटीआय)
या छायाचित्रात एक मुलगा बर्फातूनच वाट काढत चालताना दिसत आहे. पहलगाम, सोनमर्ग या भागांमध्ये चार, पाच इंच उंचीपर्यंत बर्फ साठला होता. (छाया सौजन्य- पीटीआय)
श्रीनगरमध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बर्फवृष्टीला सुरुवात झाली. ज्यानंतर बडगाम, पुलवामातही बर्फवृष्टी झाली. (छाया सौजन्य- पीटीआय)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -