Igloo Restaurant Photos : जगातील सर्वात मोठं 'इग्लू रेस्टॉरंट', फोटो पाहिलेत का?
Kashmir Igloo Restaurant : जम्मू आणि काश्मीरमधील कोरोनामुळे पर्यटकांची कमी होत चाललेली संख्या पाहता, हॉटेल व्यावसायिकाने पर्यटक आणि स्थानिकांना आकर्षित करण्यासाठी एक मोठे 'इग्लू रेस्टॉरंट' (Igloo Restaurant) तयार केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइग्लू रेस्टॉरंट बनवणाऱ्या हॉटेलचे मालक सय्यद वसीम शाह यांनी दावा केला आहे की, त्यांनी बनवलेले हे इग्लू रेस्टॉरंट जगातील सर्वात मोठे रेस्टॉरंट आहे.
या इग्लू रेस्टॉरंटची उंची 37.5 फूट आणि व्यास 44.5 फूट असल्याचे वसीम सांगतात.
वसीम यांनी सांगितले की, लवकरच गिनीज बुकची टीम येथे येईल आणि दाव्यांची पडताळणी करेल.
इग्लू बनवणे सोपे काम नव्हते. हे बनवण्यासाठी सुमारे 30 लोकांच्या टीमला सुमारे 64 दिवस लागले. या टीमने अनेक दिवस दोन शिफ्टमध्ये काम केले.
यामध्ये स्नो आर्ट, टेबल आणि खुर्च्या बनवण्याचा देखील समावेश होता, ज्यासाठी खूप मेहनत लागली.
या इग्लूचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात, एक सेल्फी पॉईंट आणि दुसऱ्या भागात 10 टेबल असलेले एक रेस्टॉरंट, ज्यामध्ये 40 लोक सहज बसू शकतात.
स्थानिक लोक आणि पर्यटक इग्लू पाहण्याचा आनंद घेण्यासह त्यांना इग्लूच्या आतमधील चविष्ट जेवणाचाही आस्वाद घेत आहेत.