Heatwave in India: यूपी-बिहारमध्ये जीवघेणी उष्णता; तीन राज्यांमध्ये आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू!
यूपीमध्ये उष्णतेमुळे हाहा:कार माजला आहे, लोक हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. एकट्या बलियामध्ये 69 जणांचा मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर, यूपीच्या वाराणसीमध्ये 7 आणि देवरियामध्ये 53 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. हे मृत्यू उष्णतेमुळे झाल्याचं सरकार अधिकृतपणे दुजोरा देत नाही. रुग्णालयातील उष्माघातामुळे मृत्यूचा हा आकडा आहे.
बिहारमध्येही कडक ऊन आहे. येथील कडक उन्हामुळे 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. परंतु जिल्ह्याचे डीएम, सिव्हिल सर्जन, आरोग्य विभागाकडून कोणतीही पुष्टी केली जात नाही. यापैकी कोणताही आकडा औपचारिकपणे जाहीर केला जात नाही.
उष्माघाताच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयात गेलेले उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी मात्र अशा काळात बेजबाबदार विधान केलं आहे. दरवर्षीच उन्हाळ्यात मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं ते म्हणाले.
मृत्यूंचं कारण उष्णता असल्याचं सांगितलं जात आहे. उष्णतेमुळे हार्ट आणि बीपी, दमा, डिहायड्रेशन, उलट्या, पोट खराब अशा समस्या उद्भवल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे.
बिहारमधील नवादा येथे उष्णतेच्या लाटेमुळे एका पोलिसाचा देखील मृत्यू झाला. उष्णतेच्या लाटेमुळे केवळ पोलीसच नाही, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे, ओडिशात तीव्र उष्णता आणि दमट हवामानामुळे उष्माघाताने पहिला मृत्यू झाल्याची पुष्टी राज्य सरकारने केली आहे. तर, मृतांच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, ओडिशात उष्माघातामुळे मृत पावलेला व्यक्ती बालासोर जिल्ह्यातील मध्यमवयीन आहे. उष्णतेच्या लाटेमुळे तेथे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे बिहारच्या अनेक जिल्ह्यांतील वीज देखील खंडित करण्यात येते, याचा रुग्णालयांवर देखील परिणाम होतो.
बसपा नेत्या मायावती यांनी ट्विट केलं की, यूपीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण उष्णतेच्या लाटेमुळे राजधानी लखनऊसह संपूर्ण राज्यात वीज टंचाईमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, त्यामुळे बलिया आणि इतर राज्यांतून मृत्यूच्या बातम्या देखील आल्या - हे खेदजनक आहे. शासनाने तात्काळ वीज व्यवस्था सुधारावी आणि रुग्णालय इत्यादींची वीज खंडित करू नये.