5 स्टार हॉटेलप्रमाणे चमचमतं देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्थानक, जागतिक दर्जाच्या सुविधा; तुम्ही पाहिलं का?
देशातील हे पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन मध्य प्रदेशात आहे. हे रेल्वे स्थानक सरकारने 45 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिलं आहे. (Image Source : Google)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील हे पहिलं खाजगी स्टेशन एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखे दिसतं. (Image Source : Google)
देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन हबीबगंज आहे, हे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आहे. (Image Source : Google)
IRDC (Indian Railways Development Corporation) ने दिलेल्या माहितीनुसार, हे रेल्वे स्थानक सरकारसोबत खाजगी कंपनीने भागीदारी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित केलं गेलं आहे. (Image Source : Google)
मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय रेल्वेने बन्सल समुहासोबत (Bansal Group) करार करून हे रेल्वे स्टेशन विकसित करण्याची जबाबदारी दिली होती.
स्थानकाच्या उभारणीसोबतच आठ वर्षांच्या देखभाल आणि संचालनाची जबाबदारीही बन्सल ग्रुपवर आहे. रिपोर्टनुसार, हे स्टेशन 45 वर्षांसाठी कंपनीने भाडेतत्वावर घेतलं आहे.
बन्सल समूह या विकासासाठी 100 कोटी रुपये खर्च करेल. या सोबतच स्टेशनच्या आजूबाजूचा परिसरही बन्सल समुहाने भाडेतत्त्वावर घेतला असून त्यासाठीही कंपनी कोट्यवधी खर्च करणार आहे.
या रेल्वे स्थानकावर शॉपिंग स्टोअर्स, रेस्टॉरंट्स, केटरिंग शॉप्स आणि पार्किंग इत्यादी अनेक प्रकारच्या सुविधा देखील समाविष्ट आहेत. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र सुविधाही आहेत. या स्थानकावर ऊर्जेसाठी सोलर पॅनलही बसवण्यात आले असून, त्यातून मिळणारी ऊर्जा स्थानकाच्या कामांसाठी वापरली जाणार आहे.
2021 मध्ये या स्टेशनचे नाव हबीबगंज (Habibganj) ऐवजी बदलून राणी कमलापती रेल्वे स्टेशन (Rani Kamlapati Railway Station) करण्यात आलं होतं.