Mahakal Corridor : उज्जैनमधील भव्य 'महाकाल लोक', ही आहेत भव्य कॉरिडॉरची खास वैशिष्ट्ये, पाहा एक झलक
मध्य प्रदेशच्या उजैनमध्ये भव्य महाकाल कॉरिडॉर तयार झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाकाल कॉरिडॉरला महाकाल लोक असंही म्हणतात. पंतप्रधानांच्या हस्ते या भव्य कॉरिडॉरचं उदघाटन करण्यात येणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल लोक भव्य मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार आहे. महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. या प्रकल्पासाठी 856 कोटींचा खर्च आला आहे. महाकाल लोक वास्तूकला आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज कॉरिडॉर लोकर्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतील.(फोटो सौजन्य : मध्य प्रदेश सरकार ट्विटर)
महाकाल कॉरिडॉरमध्ये दोन भव्य प्रवेशद्वार आहेत. याशिवाय सुंदर वास्तूकला आणि नक्षीकाम असलेले 108 स्तंभ आहेत.
शिवपुराणातील माहिती सांगणारे देखावे आणि मुर्ती, 50 हून अधिक भित्तीचित्रे आणि कारंजे अशा या कॉरिडॉरची वैशिष्ट्य आहेत. (फोटो सौजन्य : मध्य प्रदेश सरकार ट्विटर)
(फोटो सौजन्य : मध्य प्रदेश सरकार ट्विटर)
(फोटो सौजन्य : मध्य प्रदेश सरकार ट्विटर)
महाकाल लोक 900 मीटरहून अधिक लांब कॉरिडॉर आहे. हे भारतातील सर्वात मोठं कॉरिडॉर आहे.
उज्जैनमधील प्राचीन महाकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्याच्या उद्देशानं हे महाकाल लोक उभारण्यात आलं आहे. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. (फोटो सौजन्य : मध्य प्रदेश सरकार ट्विटर)
महाकाल कॉरिडॉरमध्ये दोन प्रवेशद्वार आहेत. यातील एक म्हणजे नंदी द्वार आणि दुसरं पिनाकी द्वार. हा महाकाल कॉरिडॉर भाविकांना नंदी द्वारपासून महाकालेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो.
उद्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : उजैन्न स्मार्ट सिटी लि. ट्विटर)
पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 350 कोटी खर्च आला आहे.