G-20 Summit: जो बायडेन, ऋषी सुनक दिल्लीमध्ये दाखल; पाहा फोटो
जी-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन शुक्रवारी (8 सप्टेंबर) भारतात आले आहेत.केंद्रीय मंत्री (निवृत्त) जनरल व्ही के सिंग यांनी त्यांचे स्वागत केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजी-20 परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक शुक्रवारी दिल्लीत पोहोचले. केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हेही जी-20 मध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत आले आहेत.
जी-20 परिषदेसाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पोहोचल्या आहेत. रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी त्यांचे स्वागत केले.
याशिवाय तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन हेही जी-20 परिषदेसाठी दिल्लीत पोहोचले आहेत.
अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस जी-20 परिषदेसाठी दिल्लीत पोहोचले. पोलाद आणि ग्रामविकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी त्यांचे स्वागत केले.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी जी-20 परिषदेसाठी दिल्लीत पोहोचल्या असून, कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी त्यांचे स्वागत केले.
कोमोरोसचे राष्ट्रपती अजाली असौमानी शिखर परिषदेसाठी दिल्लीत आले. रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी त्यांचे स्वागत केले.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आज G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसाही दिल्लीत पोहोचले आहेत. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.