In Pics : शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण, आंदोलनाचे फोटो
आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करुन तिथल्या खांबावर झेंडा फडकवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचं दिसून आलं असून काही शेतकरी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
ल्ली-हरियाणाच्या टिकरी बॉर्डरवर शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेट्स शेतकऱ्यांनी तोडले.
दरम्यान टिकरी बॉर्डरवर शेतकरी नेत्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांसोबत बैठक घेऊन आंदोलनाची वेळ ठरवली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
बॅरिकेट्स तोडून शेतकरी दिल्ली हद्दीवर दाखल झाले आहेत. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढून आपलं आंदोलन सुरु ठेवलं आहे. सिंघू बॉर्डर आणि धंसा बॉर्डरहून ट्रॅक्टर परेडला सुरुवात झाली आहे.
पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या.
कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तु, शेतकऱ्यांनी काही वेळ आधीच आपल्या ट्रॅक्टर परेडला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -