उत्तर भारतात उष्णतेच्या झळा, तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे
देशात दिवसेंदिवस तापमानाचा (Temperature) पारा वाढत आहे. उष्णतेमुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउष्णतेच्या (Heat) पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.
काही राज्यांमध्ये उष्णतेनं कहर केलाय. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), दिल्ली (Delhi) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) या तीन राज्यात तापमानाचा पारा हा 46 अंशाच्या पुढे गेला आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) हे शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. या शहराचं तापमान हे 46.9 अंशांवर गेलं आहे.
देशातील बहुतांश शहरात तापमान हे 40 अंशाच्या पुढे गेलं आहे. वाढत्या तापमानामुळं नागरिकांना त्रासाला सामोर जावं लागत आहे.
उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानबरोबरच इतर अनेक शहरात तापमानात वाढ झालीय.
गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशातही तापमानाचा पारा हा 45 अंशाच्या आसपास गेला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार काल (17 मे) उत्तर प्रदेशातील आग्रा हे शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. येथील कमाल तापमान 46.9 अंशांवर नोंदवले गेले आहे.
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 18 मे ते 21 मे पर्यंत उत्तर प्रदेशात कमाल तापमान 45 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.