PHOTO : ईद मुबारक! कोरोना निर्बंधांनंतरची रमजान ईद देशभरात उत्साहात साजरी
Devotees Offer Namaz At Jama Masjid : आज 'ईद-उल-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद'. देशभरात मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जात आहे. कोरोना निर्बंधांनंतर तब्बल दोन वर्षांनी देशात ईद साजरी केली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीमध्ये कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी उत्साहात ईद साजरी करण्यात आली.
मंगळवारी लोकांनी ईद-उल-फितरच्या निमित्तानं जामा मशिदीत नमाज पठन केलं.
रमजानच्या या पवित्र महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे, रमजान ईद.
दिल्लीतील जामा मशिदीत नमाज पठन करण्यात आलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विटरवर लिहिलंय की, सर्व देशवासीयांना, विशेषत: मुस्लिम बांधवांना ईद मुबारक. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर साजरा केला जाणारा हा सण समाजातील बंधुभाव आणि सद्भावना दृढ करण्याचा पवित्र प्रसंग आहे. या, शुभ प्रसंगी आपण सर्वांनी मानवतेची सेवा करण्याची आणि गरजूंचं जीवन सुधारण्याची शपथ घेऊ या.
सध्या मोदी तीन दिवसांच्या युरोपच्या दौऱ्यावर आहेत. ते ट्वीटमध्ये म्हणाले की, ईद-उल-फितरच्या शुभेच्छा. हा शुभ दिवस, आपल्या समाजात एकता आणि बंधुभाव वाढवेल. सर्वांचं उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.