भारतातील सर्वात महागडी ट्रेन पुन्हा रूळावर; एका व्यक्तीचं तिकीट 6.50 लाख रुपये,आतील फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या ट्रेनचं उद्घाटन करण्यात आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया ट्रेनचं एका व्यक्तीचं तिकीट साडेसहा लाख रुपये आहे.
कदाचित यामुळेच यातील बहुतांश प्रवासी हे परदेशी नागरिक असतात.
मुंबई ते छत्रपती संभाजीनगर, तिथून बडोदा, उदयपूर, जोधपूर, जयपूर, आग्रा, सवाई माधोपूर आणि शेवटी दिल्ली असा या ट्रेनचा मार्ग असणार आहे
2004 साली ही ट्रेन सुरू झाली होती.मात्र 2020 मध्ये कोविडमुळे तिची सेवा स्थगित करण्यात आली होती.
या ट्रेनची मालकी एमटीडीसीकडे आहे, तर सध्या तिचं व्यवस्थापन एबिक्स कंपनीकडे देण्यात आलं आहे.
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने ते भारतात येऊ शकले नाही. आता पर्यटन क्षेत्र पूर्वपदावर आले असून त्यामुळे आता डेक्कन ओडिसीची सेवा पुन्हा सुरू झाली आहे
डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यामधील मधील पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.
2004 साली तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या हस्ते डेक्कन ओडिसी गाडीचे उद्घाटन होऊन गाडीस हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता.