Cyclone Biporjoy : 'बिपरजॉय' चक्रीवादळाची तीव्रता वाढतीच, वादळी वाऱ्यांचा पावसावर परिणाम
पूर्वमध्य अरबी समुद्रावरील बिपरजॉय चक्रीवादळ गेल्या 6 तासांमध्ये 6 किमी प्रतितास वेगाने जवळजवळ उत्तरेकडे सरकलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचक्रीवादळामुळे केरळ-कर्नाटक किनारपट्टी आणि लक्षद्वीप-मालदीव आणि कोकण, गोवा किनारपट्टीवर 8 ते 10 जूनपर्यंत समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
बिपरजॉय (Biporjoy) चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान खात्याने (IMD) धोक्याचा इशारा दिला आहे.
आयएमडीने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राचं आता चक्रीवादळामध्ये रूपांतर झालं आहे. या चक्रीवादळाला बिपरजॉय नाव देण्यात आलं असून हे वेगाने उत्तरेकडे सरकताना दिसत आहे.
भारतालाही या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे की, केरळमध्ये दोन दिवसांत मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. मात्र, या चक्रीवादळाचा मान्सूनच्या तीव्रतेवर परिणाम होत असून केरळवर होणारा प्रारंभ सौम्य असेल, असं हवामान तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे, पालघर या भागात 24 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या एजन्सींनी सांगितलं आहे की, हे चक्रीवादळ अवघ्या 48 तासांत अधिक तीव्र होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील खोल दाब क्षेत्र 4 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकलं असून 'बिपरजॉय' चक्रीवादळ तीव्र झालं आहे.
नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो. यामध्ये पुढे-मागे सात दिवसांचं अंतर असू शकतं. हवामान विभागाने मे महिन्यात सांगितलं होतं की मान्सून 4 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचेल. तर, 7 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज स्कायमेट संस्थे व्यक्त केला होता. पण वादळी वाऱ्यामुळे पाऊस लांबला आहे.