Cyclone Yaas: सतर्कतेचा इशारा! ओडिशाच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता
बंगालच्या खाडी परिसरात चक्रीवादळसदृश्य परिस्थिती पाहता हवामान खात्यानं ओडिशा येथील किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'यास' (Yaas ) हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्यास प्रशासनाला पूर्ण तयारीनिशी संकटाशी दोन हात करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये या चक्रीवादळाच्या तीव्रतेसंदर्भातील चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. हे संभाव्य संकट पाहता प्रशासन भारतीय नौदलाशी समन्वय साधत असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्याच्या घडीला चक्रीवादळाचा इशारा पाहता इथं एनडीआरएफची 17 पथकं, ओ़डीआरएफच्या 20 बटालियन आणि फायर सर्विसच्या 100 तुकड्या बचावकार्यासाठी तैनात असल्याचं कळत आहे.
हवामान खात्यानं दिलेल्या पूर्वसुचनेनुसार 26 मे पर्यंत सकाळच्या सुमारास हे चक्रीवादळ ओडिशा- पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकू शकतं. ज्यामुळं या भागात मासेमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.