India This Week IN Pics: या आठवड्यातील देशातील महत्त्वाच्या बातम्या
वाराणसीमध्ये G-20 परिषदेच्या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवार, 12 जून रोजी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोमवार, 12 जून रोजी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे पोहोचल्या आणि सभेला संबोधित केलं.
तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्या निवास्थानी मंगळवारी (13 जून) ईडीने छापेमारी केली, त्यांना अटक करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (13) आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान एका ट्रकमधून प्रवास केला. या दरम्यान राहुल गांधी यांनी ट्रक ड्रायव्हरला अनेक प्रश्नही विचारले होते.
बंगाल पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (14 जून) पश्चिम बंगालच्या वेगवेगळ्या भागात हिंसाचाऱ्याच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे.
ध्या मणिपूर हिंसेच्या आगीत धगधगते आहे. गुरूवारी रात्री (15 जून) इंफाळ येथे आक्रमक जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला आग लावली.
दिल्लीमधील मुखर्जी नगरच्या कोचिंग सेंटरमध्ये गुरूवारी (15) आग लागली आणि यानंतर विद्यार्थ्यांनी छतावरून उडी मारून आपला जीव वाचवला.
बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी (15 जून) गुजरातमध्ये धडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. यामुळे 940 गावांतील 20 पेक्षा जास्त विद्युत खांब तुटून पडले आणि 22 जण जखमी झाल्याचं समोर आलं आहे.
जम्मू आणि कश्मीरच्या पूंछमध्ये शुक्रवारी (16 जून) पोलिसांना दोन संशियत बॅगा मिळाल्या आहेत. यानंतर सुरक्षा दलाने तपास करायला सुरू केला.
बंगाल पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (16) पुन्हा हिंसाचार भडकला.