Namoh 108 : कमळाची नवीन प्रजाती, 108 पाकळ्या; 'नमो 108' कमळाचे सुंदर फोटो पाहा
या कमळाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘नमो 108’ असं ठेवण्यात आलं आहे. या कमळाची खासियत म्हणजे यामध्ये 108 पाकळ्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी लखनौमध्ये “नमोह 108” नावाच्या कमळाच्या फुलाचं अनावरण केलं.
या अनोख्या कमळात 108 पाकळ्या आहेत आणि ते उत्तर प्रदेशातील लखनौ येथील CSIR आणि NBRI ने विकसित केलं आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी 108 पाकळ्या असलेल्या 'नमो 108' या कमळाच्या फुलाच्या नवीन जातीचे अनावरण केले.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR - Council of Scientific & Industrial Research) आणि नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NBRI - National Botanical Research Institute) यांनी मिळून ही कमळाची नवीन प्रजाती तयार केली आहे.
लखनौ शहरातील नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने (NBRI) कमळाची ही जात विकसित करण्यात आली आहे.
'NBRI नमो 108' जातीचं कमळ मार्च ते डिसेंबर या कालावधीत फुलते.
हे कमळाचं फूल जीनोम सीक्वेंसिंग करुन विकसित करण्यात आलं आहे.
कमळाचे फूल आणि '108 अंक' यांचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता, या कमळाच्या प्रजातीला एक विशेष महत्व प्राप्त झालं आहे.