IN PICS | शुभारंभ! पाहा देशात कोणाकोणाला मिळाली कोरोना लस
तिथं वाराणासीतही कोरोना लसीकरणाचा उत्साह पाहायला मिळाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओडिशातील संबलपूरमध्ये असणाऱ्या जिल्हा मुख्यालय रुग्णालात कोरोना लसीकरणापूर्वी आकर्षक सजावट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्रातही कोरोना लसीकरणाऱ्या पार्श्वभूमीवर जैय्यत तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
श्रीनगरमधील शेर-ए-कश्मीर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्येही कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली.
तिथं गुजरातमध्येही लसीकरणास शुभारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी हजेरी लावली होती.
लसीकरणास शुभारंभ होतेवेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचीही उपस्थिती होती.
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनाही कोरोनाची लस देण्यात आली.
पंतप्रधानांनी लसीकरणास शुभारंभ केल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात सर्वप्रथम एका आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली.
देशभरात अखेर ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस उजाडला. अथक प्रयत्नानंतर कोरोनाची लस देशातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील या मोहिमेची सुरुवात केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -