Rahul Gandhi : राहुल गांधी केदारनाथच्या दर्शनाला, पाहा फोटो
काँग्रेस खासदार राहुल गांधी रविवारी केदारनाथ धामच्या आरतीत सहभागी झाले होते. काँग्रेसने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये राहुल गांधी चंदन आणि हार घातलेले दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधी तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर गेले असता, त्यांनी केदारनाथचे दर्शन घेतले.
यावर काँग्रेसने म्हटलं की, हा त्यांचा वैयक्तिक आध्यात्मिक प्रवास आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या वैयक्तिक प्रवासाचा आदर करण्याची विनंती करण्यात आली.
जय बाबा केदारनाथ या कॅप्शनसह काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांचा व्हिडिओही शेअर केला आहे.
राहुल गांधी यांनी व्हीआयपी हेलिपॅडचा वापर न करता सर्वसामान्य प्रवाशांसाठी हेलिपॅडवर उतरले. तिथून अर्धा किलोमीटर चालत मंदिरात पोहोचलो.
मंदिराबाहेरून दर्शन घेऊन मंदिराची प्रदक्षिणा केली. त्यानंतर ते हॉटेलमध्ये गेले. असे सांगितले जात आहे की राहुल गांधी सोमवारी (6 नोव्हेंबर) केदारनाथ धाममध्ये राहतील आणि मंगळवारी (7 नोव्हेंबर) परत जातील.
केदारनाथ हेलिपॅडवर पोहोचताच तीर्थ पुरोहित समाजाने राहुल गांधींचे स्वागत केले. दुपारी एक वाजता हेलिपॅडवर पोहोचल्यानंतर ते थेट मंदिराकडे निघाले.