Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cleanliness Campaign : संसद भवन परिसरात स्वच्छता मोहीम, पाहा फोटो
यावेळी त्यांनी ''1 तारीख, 1 तास, एक साथ'' असा नारा दिला होता. श्रमदानासाठी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील संसद भवन परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आलीये.
यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन संसद भवन परिसर स्वच्छ केला.
संसद भवन परिसरामधील महात्मा गांधी पुतळ्याची देखील यानिमित्ताने स्वच्छता करण्यात आली आहे.
देशभरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान केलं जात आहे.
पंतप्रधान मोदी 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी गांधी जयंतीनिमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी 'स्वच्छ भारत' अभियान सुरू केलं.
या स्वच्छता मोहिमेअंतर्गत जनतेला त्यांच्या आजूबाजूच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यातं आवाहन केलं होतं.
आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता ठेवण्यासोबतच सर्वत्र स्वच्छता ठेवून पर्यावरणाचे रक्षण करावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलं होतं.
त्यानंतर दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त देशभरात 'स्वच्छ भारत' अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.