Christmas Celebration : मेरी ख्रिसमस... देशभरात नाताळचा उत्साह, चर्चमध्ये आकर्षक रोषणाई
आज (25 डिसेंबर) देशात आणि जगात ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस हा सण साजरा होत आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, मोठ्या संख्येने लोक आपापल्या मित्र-मंडळी आणि नातेवाईकांसह चर्चच्या ठिकाणी पाहोचले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना काळानंतर सगळेच सण अगदी उत्साहात साजरे केले जात आहेत. रांचीमध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी 'ख्रिसमस कार्निव्हल' आयोजित करण्यात आला होता.
कुलाबा, मुंबई येथील आर्चबिशप कार्निवल ओसवाल्ड्स येथे ख्रिसमसची मध्यरात्र पाहा.
अमृतसरमधील पतंग निर्माता जगमोहन कनौजिया यांनी शनिवारी (24 डिसेंबर) नाताळच्या पूर्वसंध्येला सांताक्लॉजच्या टोपीच्या आकाराचे पतंग तयार केले.
शनिवारी (24 डिसेंबर) कोलकाता येथे दिव्यांग मुलांनी 50 फूट लांब केक बनवून ख्रिसमसचा सण साजरा केला.
श्रीनगरच्या एमए रोडवरील होली फॅमिली कॅथोलिक चर्च नाताळच्या पूर्वसंध्येला दिव्यांनी उजळून निघाले.
नाताळ सणानिमित्त मुंबईतील वांद्रे येथील माऊंट मेरी चर्च दिव्यांनी उजळून निघाले होते.
मुंबईतील वांद्रे येथील ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी माऊंट मेरी चर्चला संपूर्णपणे लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनी सजविण्यात आले.
शुक्रवारी (23 डिसेंबर) केरळमधील कोझिकोड येथील एका शाळेत ख्रिसमस सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते, त्यादरम्यान विद्यार्थ्यांनी तेथे नृत्य सादर केले.