सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर आसाममध्ये असल्याचा आसामच्या मुख्यमंत्र्याचा दावा!
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे (Pune) जिल्ह्यातील भीमाशंकर (Bhimashankar)...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण आता भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद पेटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम (Aasam) सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी केला आहे.
त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी केली आहे.
भीमाशंकरचे (Bhimashankar) सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलाय. यावर राष्ट्रावादीचे आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय.
दरम्यान, आसाम सरकारच्या या अजब दाव्यावर आता चौफेर टीका होताना दिसत आहे.
यावर सरकारनं भूमिका जाहीर करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर मंदिर हे आसाममध्ये आहे, असा दावा केल्यानं भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे म्हणाले, प्रत्येक राज्यामध्ये असलेल्या मंदिराबाबत आम्हाला आदर आहे. मात्र उद्योगाप्रमाणे मंदिरे पण दुसरा राज्यामध्ये घेऊन जात आहेत का? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्राला डिवचण्यासाठी वाद करू नका.
महाराष्ट्रातील पुण्याजवळ सह्याद्री पर्वतावर असलेले भीमाशंकर मंदिर बाराव्या ज्योतिर्लिंगात सहाव्या क्रमांकावर आहे.
या शिवधाममध्ये स्थापित शिवलिंगाचा आकार खूप मोठा आणि जाड आहे म्हणून त्याला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात.