Yoga Day Celebration : देशाच्या कानाकोपऱ्यात योग दिनाचा उत्साह, भारतीय सैनिकांनीही साजरा केला योग दिन
सिक्कीममध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी योग दिन उत्साहात साजरा केला. या फोटोजमध्ये सर्व भारतीय सैनिक बर्फाच्छादित पर्वतांच्या भागात योगासन करताना दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलडाखमधील पँगॉन्ग त्सो येथे भारतीय लष्कराच्या जवानांनी योग दिनानिमित्त योगासनं केली. यावेळी लष्कराने योग करण्यासाठी लोकांना प्रेरणाही दिली.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त डेहराडून येथील महाराणा प्रताप स्पोर्ट्स कॉलेजमध्ये योगाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी फोटोमध्ये लोक योगासनं करताना दिसत आहेत.
गुजरातमधील राजकोट येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून लोकांनी जल योग साजरा केला. यामध्ये पोहण्याचा सराव करणाऱ्या लोकांनी सहभाग घेतला होता.
भोपाळमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून लोकांनी योग दिन साजरा केला.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनीही योग दिन उत्साहात साजरा केला. या निमित्त त्यांनी योग करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी लिहिलंय की, 'भारतीय संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा असलेला योग ही मानवी शरीराची गरज आहे ज्याच्यामुळे आपल्याला हजारो फायदे मिळतात.'