BSF Patrolling Amritsar : अमृतसर बॉर्डरवर बीएसएफची गस्त!
पंजाबमधील अमृतसरला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सीमेवर बीएसएफ जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. (Photo : PTI )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या या सीमेवर मोठ्या प्रमाणात धुक्याचा प्रादुर्भाव आहे, त्याचा फायदा घेऊन घुसखोरी होऊ नये म्हणून ही गस्त वाढवण्यात आलीय. (Photo : ANI )
कडाक्याच्या थंडीनंतर या परिसरात सर्वत्र धुकं पडतं आणि त्यामुळे दृश्यमानता कमी होते, त्याचा फायदा घुसखोर अतिरेकी घेण्याची शक्यता असते, अशा संभाव्य घुसखोऱ्या टाळण्यासाठी बीएसएफने गस्त वाढवली आहे. या गस्तीसाठी पायी, घोड्यांवरुन तसंच मोटारबाईकचाही वापर होत आहे. (Photo : ANI )
भारत-पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय सीमेवरील गस्तीसाठी यावेळी महिला सैनिकांनाही प्राधान्य देण्यात आलंय. पुरुष जवानांप्रमाणेच महिला सैनिकही थंडी, ऊन, वारा किंवा पाऊस या पैकी कशाचीही तमा न बाळगता देशाचं सीमाचं रक्षण करतात. (Photo : PTI )
या परिसरातील गस्तीसाठीसाठी बीएसएफ जवानांना अत्याधुनिक नाईट व्हिजन कॅमेरेही देण्यात आले आहेत. (Photo : PTI )
भारत-पाकिस्तान यांच्यातील पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर कुंपणही आहे, त्यामुळेही घुसखोरी रोखण्यात मोठी मदत होते.. तरीही धुक्याचा तसंच अंधाराचा फायदा घेऊन अनेकदा पाकिस्तानकडून घुसखोरी होते. (Photo : PTI)
काश्मीरमधील लाईन ऑफ कंट्रोल ते गुजरातमधील कच्छच्या रणापर्यंत भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही आंतरराष्ट्रीय सीमा सुमारे ३३२३ किलोमीटरची लांबीची आहे. (Photo : ANI )
या आंतरराष्ट्रीय सीमेवर आंतरराष्ट्रीय संकेतानुसार तब्बल ५० हजार पोल्सवर दीड लाख फ्लड लाईट्स बसवण्यात आलेले आहेत. पाकिस्तानला लागून पंजाबचं जवळपास ५५३ किमीचं आंतरराष्ट्रीय सीमेचं क्षेत्र आहे. (Photo : PTI )
अत्याधुनिक तंत्रत्रानाचा वापर करुन अनेकदा ड्रोनच्या सहाय्याने घुसखोरी करुन टेहळणी करण्याचे प्रयत्न केले जातात. (Photo : PTI )
बीएसएफने अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत. (Photo : PTI )